निवडणूक आयोग लागले तयारीला

37

🔹उमरखेड नगर परिषद प्रभाग निहाय सार्वत्रिक निवडणुकीची
सोडत

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.13जून):-नगरपरिषद सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत दि.13 जुन रोजी नगर परिषद मंगल कार्यालय उमरखेड येथे ठेवण्यात आली.

निवडणूक आयोगाने यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली निवडणूक आयोगाने आज दिनांक 13 जून रोजी नगरपरिषदेच्या प्रभागाचे आरक्षण सोडत काढली.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2022 जातीनिहाय व प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगर परिषद मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड ,मुख्याधिकारी किरण शुकलवार यांच्या नेतृत्वात नगरपरिषद होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोडत पार पडली.

एकूण 13 प्रभागाची प्रभाग निहाय रचना करण्यात आली .महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन प्रभागाची रचना करण्यात आले त्यात दोन प्रभाग क्रमांक 9 व 5 अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला अशी तीन प्रभागाची जातीनिहाय व प्रभाग क्र. 7 अनुसूचित जमाती व महीला सर्वसाधारण अशी प्रभाग रचना सोडत करण्यात आली.

प्रभाग क्रमांक 6 ची लोकसंख्या 1049 तर त्याची 26 .55 %अशी काढण्यात आली तसेच प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 814 असून 22.78 % तर अशी काढण्यात आली व प्रभाग क्रमांक 5 ची लोकसंख्या 722 असून 22.03 %टक्केवारी काढण्यात आली.

या आकडेवारीनुसार आरक्षित प्रभागाची सोडत काढण्यात आली याप्रसंगी उमरखेड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी शहरातील व राजकीय पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2022 चे सोडत करण्यात आले.

येणाऱ्या निवडणुकीवर सर्व राजकीय पुढार्‍यांचे आकडेमोड सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.