रोहित देशमुख तालुक्यातून द्वितीय

🔸रोहित देशमुख तालुक्यातून द्वितीय

🔹बारावी विज्ञान शाखेत मिळवले ८४.३३% गुण

✒️मूल(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मूल(दि.14जून):-नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात रोहित विकास देशमुख याने ८४.३३% गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे . माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे बारावीत विज्ञान शाखेतुन रोहितने मूल तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे .

रोहित देशमुखचे वडील विकास देशमुख जुनासुर्ला येथील शेतकरी असून रोहितला यश मिळावे यासाठी सातत्याने प्रेरणा देत आलेत . त्यात रोहितच्या आईचा मोलाचा वाटा आहे . म्हणूनच आपल्या शिक्षकांच्या मार्गदशनाखाली अथक परिश्रम घेत रोहितने इतरांना प्रेरक ठरेल असे यश संपादन केले . रोहितने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून , त्याचे मित्रवर्ग , पालक , शिक्षक व जुनासुर्लाचे सरपंच रंजित समर्थ आणि सर्व गावकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला .

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED