शिवानीताई वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी सुरज मेश्राम तर उपाध्यक्षपदी मयुर मेश्राम यांची नियुक्ती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17जून):-पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून तळागाळातील युवकानं पर्यंत पक्षसंघटनेचे कार्य पोहचविण्यासाठी तथा शहरातील सर्वसामान्य युवकांचा आवाज बनून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ब्रम्हपुरी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ब्रम्हपुरी येथील युवा नेतृत्व सुरज मेश्राम तर शहर उपाध्यक्षपदी मयुर मेश्राम यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.

सुरज मेश्राम यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी भरीव योगदान दिले. त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास दर्शवित त्यांची युवक काँग्रेसच्या ब्रह्मपुरी शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.

यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. खेमराजजी तिडके, माजी जि. प. सदस्या सौ स्मिताताई पारधी, ब्रम्हपुरी तालुका महीला काँगेस अध्यक्षा सौ. मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, माजी जि. प. सदस्य भावनाताई इरपाते, ब्रम्हपुरी शहर महीला काँगेस अध्यक्षा सौ. योगिताताई आमले, न. प. नगरसेविका सौ. सूनिताताई तिडके, न. प. नगरसेविका सौ. लताताई ठाकूर, न. प. नगरसेविका वनिताताई अलगदेवे, न. प. नगरसेविका नीलिमाताई सावरकर, माजी नगरसेवक जगदीशजी आमले, सोनेगाव चे सरपंच सोनु मेश्राम, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय ब्रम्हपुरी जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, अमोल सलामे, सुरेश वंजारी तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED