दामिनी देवेंद्र पटले नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.17जून):-नुकताच एच .एस .सी .बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थ्यांनी नैपुण्य गुण प्राप्त केले. या निकालात महाविद्यालयातून सानिया कादिर शेख हिने विज्ञान शाखेतून 90.33% घेऊन प्रथम, हिमांशी ढोके 84. 40 % घेऊन द्वितीय तर प्रणय. पडोळे. 84% घेऊन तृतीय आला. न. प.नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी मराठी विषयात घवघवीत यश संपादन करून मराठी विषयाची समृद्धता वृद्धिंगत केली. तसेच कु. दामिनी पटले हिने 12 वी विज्ञान शाखेत 84 % ( मराठी विषयात 86 गुण) घेऊन महाविद्यालयातून तृतीय आली. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रा. संजय लेनगुरे यांनी कु. दामिनी हिचे तालुक्यापासून 16 ते 18 किमी अंतरावर असलेला बघेडा या खेड्यातील निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक प्रगती करिता शुभेच्छा दिल्या.

मराठी ही मातृभाषा असून विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांनी नैपुण्य गुण प्राप्त करणे काहीच कठीण नाही. हे कु. दामिनी पटले हिने सिद्ध केलेले आहे. न. प. नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील या विद्यार्थिनी असून प्रा. संजय लेनगुरे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. सदर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि नियमित मार्गदर्शक शिक्षक यांना दिलेले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे, नागपूरहुन राजेंद्र झाडे, संजय खेडीकर, भाऊराव पत्रे, सपन नेहरोत्रा, किशोर वर्भे, दीपक नागपुरे, भारत रेहपाडे, भंडाराहुन दिनेश पीकलमुंडे, उमेश सिंगनजुडे, विनोद किंदर्ले, तुमसरहुन प्रशासकीय अधिकारी देवानंद सावके,प्राचार्य भारत थोटे, रमेश बोंद्रे, नरेंद्र पडोळे, भास्कर उपरीकर, योगिता निमजे, भावना राऊत, हिरा बोन्द्रे, नितुवर्षा घटारे, शालिनी कांबळे, जितेंद्र टीचकुले, अमृत मोहतुरे, विलास लांडे, ज्ञानेश्वर जांभुळे, विजय लोणारे, अजय यादव, इत्यादीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच. जिल्ह्यात गुणवंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED