लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या शाळांचा उत्कृष्ट निकाल

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17जून):-नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शीक्षण मंडळाच्या वर्ग 10 वी च्या निकालात येथील लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सर्व शाळांचा निकाल उत्कृष्ट लागला असून शाळातील विद्यार्थांनी गुणांची बाजी मारली आहे. विद्यार्थाच्या यशाबद्दल स्मारक मंडळाचे पदाधिकारी,सदस्य तसेच शाळांच्या मुख्याध्यापक व शीक्षकांनी अभिनंदन केले आहे.

लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीने येथे लोकमान्य टिळक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. या विद्यालयातील 269 विद्यार्थी दहाविच्या परिक्षेत बसले होते यातील 261 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 97.02 टक्के इतका लागला आहे. शाळेचा विद्यार्थी तेजस महेष खेमसकर हा प्रथम आला असून हिला 86.60 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतील 28 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळेतील 221 विद्यार्थीनी दहाविच्या परिक्षेला बसल्या होत्या व त्या सर्वही उत्तीर्ण झालेल्या आहेत. शाळेची विद्यार्थीनी कुमारी श्रुष्टी संयज कावळे ही शाळेतून प्रथम आली असून तिला 94 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतील 8 विद्यार्थींनी 90 टक्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या असून 96 विद्यार्थीनी प्राविण्य श्रेणी घेऊन यशस्वी झाल्या आहेत.

मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक ज्ञान मंदिराचा निकालही 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातील 61 विद्यार्थी दहाविच्या परिक्षेला बसले होते व ते सर्व उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेची विद्यार्थीनी कुमारी मुस्कान सेठी हीला 91.40 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतील 4 विद्यार्थांनी 90 टक्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले असून 13 विद्यार्थ्यानी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.

स्मारक मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या या शाळांमधील विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष-.रविंद्र भागवत, उपाध्यक्ष-प्रशांत घट्टूवार, सचिव-गांगेय सराफ, सहसचिव – डॉ.राम भारत, कोषाध्यक्ष -अरूण मदनकर, सदस्य- दत्तप्रसन्न महादाणी, डॉ..प्रविण पंत, नंदकिषोर वेखंडे, मंडळाचे अन्य सदस्यांनी अभिनंदन केले.

मुख्याध्यापिका-सौ मंजुशा अडावदकर, उपमुख्याध्यापिका- शैलजा पाटील, पर्यवेक्षक-प्रफुल्ल राजपुरोहित, मुख्याध्यापिका मंजिरी डबले, उपमुख्याध्यापिका-मंगला बंडिवार, पर्यवेक्षक-सौ संध्या बडकेलवार, मुख्याध्यापिका – सौ रश्मी कावडकर, पर्यवेक्षक – गजानन कुऱ्हेकार, तिनही शाळांचे शीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राविण्या प्राप्त विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे. तिन्ही शाळात प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.