प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना वह्या वाटप

✒️महाड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

महाड,रायगड(दि.18जुन):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभागीय उपाध्यक्ष योगेश भामरे यांनी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोचिंदे महाड या शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शिक्षक महेंद्र शिर्के, रवींद्र नाजरे, वसंत दासगांवकर, विनय भामरे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

योगेश भामरे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून ते संयमी, अभ्यासू, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आपला वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. योगेश भामरे यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, सर्व राज्य पदाधिकारी, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक संजय लांडगे, कोकण सरचिटणीस महेश महाजन, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED