प्रहार चे तालुका अध्यक्ष अमोल केसरे आणि शाखा अध्यक्ष अनिकेत साळुंके यांचा वाढदिवस विविध समाज उपक्रमांनी साजरा

96

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.18जून):- प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे आणि उंदरगावचे शाखा अध्यक्ष अनिकेत भाऊ साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यातील उंदरगाव आणि वाकाव गावात अंगणवाडी आणि बालवाडीतील 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ (पाटी, वह्या उजळणी पेन्सिल, बिस्किटे, चॉकलेट, केक) वाटप करून तसेच जनावरांचे आरोग्य शिबीर, गर्भतपासणी शिबिर, वृक्षारोपण करत, गोरगरिबांना मोफत धान्य वाटप प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम पाटील यांचे हस्ते करत वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रहार शेतकरी संघटना कायम समाजसेवेचा वसा घेत विविध उपक्रम राबवत पुढे चालत आहे.

आमचे लाडके नेते, अपंगांचे दैवत , विधवा, परितक्त्या, अपंग बांधव यांच्या साठी कायम लढणारे मा.ना. बच्चु भाऊ कडू कायम सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचा वसा आणि वारसा जपत प्रहार शेतकरी संघटना कायम काम करत आहे.प्रहार शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील आणि शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या हस्ते सोलापूर जिल्हयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामुळे वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळत समाज उपयोगी काम करत प्रहार शेतकरी संघटना काम करत आहे. येणाऱ्या काळातही समाज उपयोगी काम करत , सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देत काम करणार असल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी सांगितले. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, संतोष कोळी, गणेश सुतार, शाखा अध्यक्ष अनिकेत साळुंके, विजय जगताप, यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.*