इसापूर धरण येथील उर्दु शाळेला मंजूर पदानुसार अजूनही मिळाले नाहीत शिक्षक

56

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19जून):-तालुक्यातील इसापूर धरण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळेला सध्या शिक्षकांची कमी आहे. इसापूर येथील या उर्दु शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून विध्यार्थ्यांची पट संख्या 230 एवढी आहेत. या शाळेला केवळ चार शिक्षक कार्यरत असून, 6वी ते 8वी या वर्गाना मागील तीन वर्षांपासून एकही शिक्षक नाही. या शाळेला मंजूर पदे नऊ असून कार्यरत शिक्षक फक्त तीनच आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत पालकांनी कंटाळून एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही असा निर्धार केला आहे.

यासाठी ईसापुर ग्रामपंचायत उपसरपंच बी.सी थोरात, ग्रामपंचायत सदस्य शेख मुशीर शेख ख्वाजा, शाळा व्यवस्थापण समितीचे माजी अध्यक्ष शेख हाशम, शाळा व्यवस्थापण सदस्य हशु खान पठान, शेख जब्बर भाई, शेख अमीन इत्यादीनी शिक्षण अधिकारी साहेब, प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांना लवकरात लवकर शिक्षण पाठवावे यासाठी निवेदन केले आहे. जोपर्यंत शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, असे धोरणच जणू या उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मानलेले आहे.