आगामी जि.प. आणि न.प. स्वबळावर मनसे लढणार – डेव्हिड शहाणे मनसे उपजिल्हा प्रमुख यवतमाळ)

31

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.19जून):-येणाऱ्या आगामी निवडणुक जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, मनसे स्वबळावर लढणार असे उपजिल्हा अध्यक्ष डेव्हीड शहाणे यांनी विश्रामग्रह आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.जेव्हा 2006 ला मनसेची स्थापना झाली तेव्हा पासून तालुक्यात व शहरात विविध प्रकारचे आंदोलने उपोषण सामान्याच्या प्रश्न सोडविण्या करीता मनसे कार्यकर्त सक्रीय होते.यांचे फलीत म्हणून 2011 मध्ये पंचायत समिती ला 4 उमेदवार उभे केले होते.

व सोनादाबी येयील दत्ता पिलवंड हे पंचायत समिती सदस्य महणून निवडून आले. त्यांनतर ढाणकी ग्रामपंचायत येथे सादीक शेख ग्रामपचायत सदस्य म्हणून तर बिटरगाव ग्रामपंचायती मध्ये राजु पिटलेवाढ मनसे कइन निवडूण आले.तसेच गुडीपाडव्या पासून आम्ही सर्व सामान्य नागरीकांच्या व युवकांच्या संपर्कात आहो . यावेळेस आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचुन अनेकाच्या संपर्कात आहोत.तसेच यावेळेस पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाने ” एकला चलो रे ‘ अशी भुमिका घेण्यात आली आहे. असे प्रतिपादन मनने शहर अध्यक्ष संजय बिजोरे यांनी पापरीषदेत केले यावेळी उप जिल्हा प्रमुख डेव्हीड शहाणे,तालुका अध्यक्ष साजीद शेख, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता पिलवंड, माजी ग्रांमपंचायत सदस्य राजु पिटलेवाड,शहर अध्यक्ष संजय बिजोरे,मुकुंद जोशी,संदीप कोकाटे,आकाश ओझंलवार, प्रकाश शिंदे, मनोज कदम,अमोल लामटिळे, सचिन शेरे इत्यादी मनसे कार्यकर्ते पञकार परीषदेत उपस्थीत होते.