केंद्रसरकार पुरस्कृत ईडीच्या गैरवापर विरोधात युवक काँग्रेसचे मशाल आंदोलन

29

🔸मशाली पेटवून केला जाहीर निषेध..

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.19जून):-गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना विनाकारण त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत आहे.कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली नाहक मनस्ताप दिला जात आहे या दडपशाही विरुद्ध उमरखेड काँग्रेस व युवक काँग्रेस च्या वतीने दि 18 जून रोजी मशाली पेटवुन तीव्र आंदोलन करण्यात आले.

कॉग्रेस कार्यालय उमरखेड येथे सायंकाळी 7 वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालया मार्फत नोटीस दिली गेली होती त्यानुसार ते 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहिले मात्र सक्तवसुली संचालनालय त्यांना दररोज बोलावून नाहक त्रास देत आहेत सतत चौकशीसाठी बोलणे दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालने वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही सहभाग असल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी कडून सांगण्यात आले.

या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक 18जून रोजी सायंकाळी सात वाजता कॉंग्रेस कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तातुभाऊ देशमुख, काँग्रेचे नेते गोपाल अग्रवाल, कृष्णा पाटील देवसरकर , माजी जि.प सभापती रमेश चव्हाण, तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव शिंदे, युवराज पाटील देवसरकर, अँड. जितेन्द्र पवार , शैलेश अनखुळे विरेन्द्र खंदारे, सोनु खतीब, आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस कार्यालय येथे केंद्र सरकारच्या विरोधात मशाली पेटवून आंदोलन करण्यात आले.