प्रा. डॉ. रघुनाथ आण्णा केंगार यांचा सेवानिवृत्ती समारंभ

25

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.28जून):- वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील जेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, ‘क्रांतिबा’ नियतकालिकाचे संपादक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ आण्णा केंगार दिनांक 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने कॉलेजमधील कलारंजन सभागृहात सकाळी ठीक 9:30 वाजता संस्थेच्या वतीने ‘सेवानिवृत्ती सत्कार व शुभेच्छा समारंभ’ आयोजित केला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती प्रा. डॉ. रघुनाथ केंगार सर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांनी महाविद्यालयात मराठी विषयाचे 32 वर्षे 11 महिने अध्यापनाचे कार्य केले आहे. सरांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात केलेल्या कार्य आणि कर्तुत्वामुळे सरांना अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या तासगाव येथील दहाव्या वार्षिक अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.तरी डॉ. रघुनाथ आण्णा केंगार यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी, हितचिंतकांनी सदर सेवानिवृत्ती सत्कार समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.