खेड तालुक्यातील ७० शाळांमधील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

26

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.28जून):-नक्षञाचं देणं काव्यमंच,महाराष्ट व वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्ट आणि “मुप्टो”टिचर्स असोसिएशन,पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील एकुण ७० शाळांतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व सर्व शाळेतील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला. आनंदी आनंद मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेली १५ वर्ष या उपक्रमाने अखंडपणे राबविला जात आहे.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले. ते म्हणाले की,”यशस्वी व गुणवंत सत्कार म्हणजे कौतुकाची थाप असते. यशस्वी व्यक्तींना समाजाने शब्बासकीची थाप देणे आवश्यक आहे. मिळालेल्या यशात पालक, शिक्षक,विद्यार्थी यांचे खुप मोठे परिश्रम असतात. मिळालेल्या यशाला समाजाने कौतुक करुन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.नक्षञाचं देणं काव्यमंच गेली अनेक वर्ष शाळेंमध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन गुणवंतावाढ उपक्रम घेत असते.विविध स्तरावर विद्यार्थी घडत असतो.त्याला प्रोत्साहन देणारी संस्था आहे.”

यावेळी करियर मार्गदर्शन करण्यात आले. नॅशनल कौन्सलर प्रा.शरद शिंदे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. “विविध क्षेञातील शाखा व त्यांना शाखेंना कसा प्रवेश घ्याचा.तसेच विद्यार्थी हा गुणवंत असल्याने त्याला परिश्रमाची आवड आहे.त्यामुळे तो कोणत्याही क्षेञात यश मिळवु शकतो. फक्त त्याला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्याबद्दल जागृत राहुन फक्त चालणार नाही.त्याला नवनवीन वाटांची जाणीव करुन दिली पाहीजे. त्याला स्वत:ला त्याच्या क्षमतांची जाणीव होवू देण्यासाठी त्यांच्या विचारांना,कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करावा.”असे विचार आपल्या मार्गदर्शनातून मांडले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.विनोद चौधरी यांनी मनोगतात म्हणाले की,”शाळांनी आणि मुख्यापकांनी अतिशय उत्तम प्रकारे शाळेचा यावर्षी निकाल लावला आहे.आज प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाकडे जाताना सीएटी व नीट सारख्या परीक्षा देताना अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.पालकांनी दहावीप्रमाणे बारावी पर्यंतची परीक्षा उत्तीर्ण होत पर्यंत त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”

यावेळी मेजर गजानन सोनवणे,किरण माळवे,दत्ता भगत, लतिफ शाह, प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.विनोद चौधरी, प्रा.शरद शिंदे, सौ.मीरा माळवे, सुदाम चौधरी,प्रा.सतिश वाघमारे, इ.मान्यवर उपस्थित होते.बहारदार सुञसंचालन तुषार वाटेकर यांनी केले.उपस्थित विद्यार्थी वर्गाचा गौरव गोल्डमेडल,गौरवपञ,गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.मुख्याध्यापकांना गौरवपञ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला