अहिंसा पतसंस्था सन्मानित

46

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28जून):-सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकारातून सेवा करणाऱ्या पतसंस्थेचा सन्मान चिन्ह देऊन नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात आला.महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.विद्याधर अनास्कर यांचे हस्ते अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी स्विकारला.

यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील,जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,सर्व संचालक व फेडरेशनचे मुख्य व्यवस्थापक क्षीरसागर साहेब,जिल्ह्यातील पतसंस्थांचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.