स्वप्नपूर्ती निःशुल्क रक्त सेवा तर्फे छगन भाऊ डहारे यांच्याकडून रक्तदान

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28जून):-पवनी येथे (कांडला जंगल सफारी) येथे कार्यरत असलेले छगन भाऊ डहारे यांनी ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद हॉस्पिटल येथे जाऊन रक्तदान केले. ते अपंग असून सुद्धा रक्तदानासाठी लगेच तयार झाले खरच त्यांच्याकडे बघून त्यांच्यात माणुसकीचा चेहरा पाहायला मिळाला. असून यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे. आणि समाजाला प्रेरणा देणारे आहे. आणि त्यांचे स्वप्नपूर्ती रक्त सेवा सावरगाव तर्फे अभिंनदन करण्यात येत आले.

खरतर आज रक्त कमतरतेच संकट राज्यभर आहे. थैलेसेमिया रुग्ण, रक्त कॅन्सर रुग्ण, अपघातग्रस्त, गरोदर स्त्रियांना, तसेच इतर रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आपण सर्व अहोरात्र धावपळ करतो हे निश्चित आनंदाची बाब आहे. ही चळवळ अजून मजबूत करण्यात येत आहे.

आज विविध ठिकाणी रक्तदान शिबीर असेल तेथे किंवा रक्तपेढीत जाऊन रक्तदान करा तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील रक्तदान करायला आवाहन करा.काळ-वेळ, ऊन-पाऊस, जवळ-दूर असा कुठलाही विचार न करता क्षणार्धात धावुन येणा-या सर्व रक्तदात्यांना लाल क्रांतिकारी सलाम.चंद्रपूर जिल्हा थैलेसेमिया व स्वप्नपूर्ती रक्त सेवा समितीचे सदस्य रक्तदान करताना छगन भाऊ डहारे B निगेटिव्ह लगेच त्यांनी ख्रीस्तानंद ब्लड बैंक ब्रम्हपुरी येथे येऊन गुलाब राखडे या पेशंट करीता B निगेटिव्ह ब्लड ग्रुप डोनेशन केले त्या बद्दल युवा रक्तदात्याला लाल क्रांतिकारी तर्फे रक्तदात्याच अभिनंदन करण्यात आले.