झाडगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न

31

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)

तालुका कृषी अधिकारी , उमरखेड कार्यालय यांच्या वतीने 25 जून ते 1 जुलै 2022 या कालवधी मध्ये श्री. गंगाधर बळवंतकर तालुका कृषी अधिकारी उमरखेड व मंडळ कृषी अधिकारी निषांत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

झाडगांव येथे मंगळवार दिनांक 28 जून 2022 रोजी कृषी पर्यवेक्षक आर. एन शिंदे व कृषी सहायक सोमनाथ जाधव यांनी कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन केले होते .या कार्यक्रम मध्ये सोयाबीन लागवड तंत्रज्ञान , बीबीएफ पद्धत 22 किलो , टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाणे12-14 किलो प्रति एकर बियाणे पेरणी करीता आवश्यक आहे म्हणजे यामधे बियाणे कमी प्रमाणात लागते.

तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत बांधावर व शेतावर फळबाग लागवड आंबा , पेरू , सिताफळ व चिक्कू ची माहिती देण्यात आली .कृषी पर्यवेक्षक आर एन शिंदे यांनी शेतकरी अपघात विमा योजना , पिकानुसार खतांचा संतुलीत वापर करून खताची 10 टक्के बचत होते ,बाबत माहिती दिली . यावेळी झाडगांवचे सरंपच सुचीता सुनील शिंदे , उपसरंपच शंकर शिंदे , गजानन शिंदे , पोलीस पाटील विनायक शिंदे , गजानन गरवारे तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.