बेलोरा ( धामक ) येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

30

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.28जुन):-शेतीमधील नव नवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन करणे व शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यावर मार्गदर्शन करणे या प्रमुख उद्देशातून तालुका कृषी अधिकारी,नांदगाव खंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जवळपास ३० गावात दिनांक २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रामुख्याने शेतकरी प्रशिक्षण, सभा,शेतीशाळा, शिवारफेरी,वेबिनार व प्रात्यक्षिक च्या माध्यमातून परिसरातील प्रगतशील शेतकरी, रिसोर्स फार्मर व शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडत आहेत.

या मोहिमेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी, हे बेलोरा धामक या गावात आज दि २८ जून रोजी खताचा संतुलित वापर दिन म्हणून किसान गोष्टी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी . तालुका कृषी अधिकारी,रोशन इंदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक संजय ढोक यांनी खताचा योग्य वापर, सूक्ष्ममूलद्रव्ये व त्यांचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ए व्ही वानखडे कुषी पर्यवेक्षक , यांनी जैविक व सेंद्रिय खते, जैविक व सेंद्रिय औषधे यांचा वापर शेतीमध्ये वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रिया, तणनाशकाचा वापर व खतांचा संतुलित वापर, येणारे संभाव्य रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ,उपसरपंच दिलीप सोरते , शेतकरी अमोल सोरते संजय बेन्द्रै गणेश बेन्द्रे धनराज बेद्रे गणेश मोरे प्रदीप पराते बाल्या सोरते संदीप मेश्राम चेतन धवने गजानन मेश्राम अविनाश काळमेघ कार्यक्रमास गावातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक एस डी सुपारे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रा प कमर्चारी राजु शहा यांनी केले.