शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थयांचे शाळेत वाजत गाजत स्वागत-मुलाना गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश

26

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जुन):-उन्हाळ्याच्या सुटयानंतर चिमूकलयांच्या किलबीलाटाने 29 जून बुधवारला शाळा गजबजुन गेल्या, पहिलाच दिवसी शिक्षकासह शाळा व्यवस्थापन कमेटिने पुष्पवृष्टि करीत ढोल तास्याच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले, पहिल्याच दिवसी झालेल्या स्वागताने विद्यार्थीही भराऊन गेले,चिमूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (मुले) येथील शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवसी शाळेतिल वातावरण आनंदमई करण्यात आले होते.

मुलांच्या स्वागतासाठी शाळेच्या दरवाजाची आकर्षक फुले, फुगे यानी सजविलेल्या कमानिची सजावट करुण मुलांचे व मुलांसोबत आलेल्या पालकांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करर्णययात आले, त्यपूर्वी चिमूर शहरातील मुख्य मार्गानी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूकिमधे शिक्षकांसह पालक सहभागी झाले होते, शाळेच्या पहिल्याच दिवसी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थीना, गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले, व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मुलाना गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूरच्या मुख्याध्यापिका सौ छाया खोबरागड़े, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी सातपुते, सहायक शिक्षिका सौ, सरिता गाड़गे, पालक मोहनीश जुमड़े, अजय जुमड़े, सुनील सातपुते, प्रमोद बनकर, अजय जुमड़े, लक्ष्मीकांत बावनकर, सौ, प्रिया हरदास, अश्विनी सातपुते, सोनू बावनकर, कविता सातपैसे, वनिता नागोसे, वैशाली मिसार, कुंदा यलने, नलिनी देवगिरकर, नालुताई कडुकर, मंगला राउत उपस्थित होत्या.