उमरखेड शहरातील रस्ते गेले खड्ड्यात

31

🔹प्रशासन मात्र निद्रावस्थेत 

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6जुलै):-शहरातील विविध मुख्य रस्यावर पाणी साचल्याने रस्ते गेले सर्व खड्ड्यात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, गायत्री चौक, ढाणकी -बिटरगाव रोड वर साचलेल्या पाण्यामूळे झालेल्या खड्ड्यातून मार्ग काढताना जनतेला नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील अनेक सकल भागात पाणी साचलेले असल्याने अद्यापही या पाण्याचा निचरा न झाल्याने त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो शहरात ठीक ठिकाणी गुडघे एवढे खड्डे झाले असून प्रशासन मात्र निद्रा अवस्थेत आहे अवघ्या दोन-चार दिवसाच्या पावसातच शहरातील सर्व खड्डयांनी प्रशासनानी केलेल्या सर्व रत्याच्या कामाची पावती दिली. तसेच दररोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणीतून मार्ग शोधावा लागतो व रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक आवडेल त्या खड्ड्यातून प्रवास करताना दिसतात.

ग्रामीण भागाकडे जाणारा डांबरी रस्ता प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे खड्डेमय असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

छ.शिवाजी महाराज चौकातील मुख्य ठिकाण ग्रामीण जनतेची बाजारपेठ म्हणून लोकांची गर्दी असते.

त्यातच पडलेल्या पाऊसाने सर्वीकडे पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे फजीती पाहावयास मिळते साचलेल्या पावसाने मोठमोठे खड्डे झालेलेआहेत ढाणकी, बिटरगाव, किनवट अशा अनेक ग्रामीण भागाकडे जाणारा रस्त्याची चाळणी झाली आहे तरीपण प्रशासन खड्डे बुजून याकडे लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

संबधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फक्त भंगारातून निघालेल्या लोखंडाची परस्पर विक्री करूनच पैसा कमावण्याचा गुत्ता घेतला आहे का ? असेही चर्चिले जात आहे.

प्रशासनाच्या या नाकर्तेपणामुळे शहरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

स्वच्छ आणि सुंदर अशी औदुंबर नगरींचीचा स्वप्न दाखविणारे पुढार्‍यांना शहरातील जिवघेण खड्डे दिसत नाही का ?शहरातील रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल प्रशासन कमी करेल का ? सदर रस्त्यातील खड्डे मुळे एखाद्याच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवू शकतो शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देत शहरातील व ग्रामीण भागाला जाणारा रस्ता दुरुस्ती करून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे .”एका आमदारांनी काव्यमय पंगती म्हटल्याप्रमाणेच” ”’काय हे रस्ते, काय हे खड्डे, काय हे साचलेलं पाणी प्रशासन मात्र लई Ok…!