म्हसवडमध्ये विठ्ठल नामाची शाळा;सरस्वती विध्यालयातील चिमुकल्याचा दिंडी सोहळा

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6जून):-विठुराया अन आषाढी वारीचे महत्व म्हसवड शहरातील सरस्वती विध्याल्यामधील चिमुकल्याना पण समजावे या उद्देशाने मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विध्यालयातील चिमुकल्या विध्यार्थ्यानि वारकऱ्यांच्या वेशात संपूर्ण म्हसवड शहरातून दिंडी काढण्यात आली यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात म्हसवड शहर आणि परिसर दुमदुमून गेला.गेले दोन वर्षे कोरणा संसर्गामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे पालखी सोहळ्यावरही मर्यादा आल्या होत्या त्यावेळी माऊलींचा सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येत होता. परंतु यंदा यावरील निरबन्ध शिथिल झाल्याने पालखी सोहळा भक्तिमय वातावरनात साजरा होत आहे.

विठुराया अन आषाढीचे महत्व शहर शाळा परिसरातील विध्यार्थ्याना समजावे म्हणून अनेक शाळांमधून उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्यात आला चिमुकल्या विध्यार्थ्यानी यात सहभाग नोंदवून विठुनामाचा गजर करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पहिली ते सातवीतील विध्यार्थी या सोहळ्यात भगवा झेंडा,टाळ मृदंग हाती घेऊन सामील झाली तर विध्यार्थीनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या.या सर्व दिंडी सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापिका सौ.शेटे मॅडम यांनी केले.