कृषिदुतांनी राबविला बिज प्रक्रिया विशेष प्रकल्प

53

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6जुलै):-ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नीत कृषी महाविद्याल उमरखेडच्या कृषिदूतानी उमरखेड तालुक्यातील पोफाळी शेती शिवारात बीजप्रक्रियेचा विशेष प्रकल्प राबविला.

यावेळी कृषिदूत आदित्य मुसळे, पवन कोरडे, आकाश पवार, गणेश काळसरे, गुणवंता वानखेडे, ज्ञानेश्वर लुंगे यांनी संतोष विश्‍वास शिलार, नितीन माहेश्वरी, बालाजी रामराव काकडे, राजाराम नारायण काळसरे, अतुल वसंता हंगाडे, गंगाराम नारायण काळसरे यांच्या शेतात जाऊन बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी. बियाण्यास बुरशी नाशके तसेच जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करूनच पेरणी करावी,असे आवाहन कृषी महाविद्यालय, उमरखेड येथील कृषिदूतांनी केले. बुरशीनाशके तसेच जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास रोगास प्रतिबंध होऊन उत्पादन वाढीस मदत होते.

यावेळी बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित शेतकरी व गावकरी यांना शंभर टक्के बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आव्हान करण्यात आले.

बीजप्रक्रियेचे महत्त्व, त्यांची योग्यपद्धत व घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. सदर उपक्रमाला विषयतज्ञ वाय. एस. वाकोडे सर व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंतले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. ए. बी. तामसेकर सर, प्रा. ए. एस. राऊत सर, प्रा. के. एस. आगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले.