हिंदुस्तान फिड्स व दत्तकृपा पशुखाद्य कुरुल यांच्या संयुक्त विद्यमाने 1800 वह्यांचे वाटप

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.८जुलै):-रोजी हिंदुस्तान फिड्स व दत्तकृपा पशुखाद्यचे डिलर अमोगसिद्ध पवार यांच्या संयुक्त विद्यमाने
कुरुल प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना १८०० वह्याचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी म्हणून C.S.R Feeds .योजनेतुन शेतकऱ्याच्या मुलांना जर वर्षी हिंदुस्तान फिड्स यांच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्याच वाटप करण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून कुरुल जिल्हा परिषद शाळेमधील घोडके वस्ती, महादेव ओढा, पाटील वस्ती, वाडीचा ओढा, कुरकुजी पाटील, उजनी वसाहत,पाटकर वस्ती मधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पहिली ते दुसरी विद्यार्थ्यांना २ वह्या व तिसरी ते चौथी विद्यार्थ्यांना ५ वह्याचे वाटप करण्यात आलं.

हिंदुस्तान फिड्स मार्केटिंग ऑफिसर गायकवाड डि.के, डॉ. बोरुडे ,पवार एस. बी. इंगळे बी.सी, भोसले साहेब, दत्तकृपा पशुखाद्य डिस्ट्रीब्यूटर अमोगसिद्ध पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.यावेळी चेअरमन सागर लामतुरे, संतोष गुरव, शंकर पाटील, अण्णा गोर्धनकर, भैय्यासाहेब पाटील, पांडुरंग घोडके, कुरुल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक मुचंडे केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे, शिक्षक कांबळे, शिंदे, गोवर्धनकर, कांबळे, शिक्षिका, सोनवणे, लामतुरे तोरखडे आदीसह उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED