आपण नव्या संस्कृतीचे वारसदार!

115

१९५१ च्या जनगणनेपर्यंत भारतात एकही बैाद्ध नव्हता. म्हणजे आपण हिंदू म्हणून जगलाे आणि आपल्या चालीरीती त्याच धर्मावर आधारीत हाेत्या.बाबासाहेबांनी हिंदू म्हणून जे भाेगलं,अनुभवलं ते अतिशय किळसवाणं हाेतं.माणसांपेक्षा जनावरांना चांगली वागणूक मिळायची हे सर्वमान्य,सर्वश्रुत आहे.धर्म का बदलावा,हिंदू धर्मातुन बाहेेर का पडावं?याविषयी बाबासाहेबांकडे केवल ऐकीव माहीती नव्हती तर त्यांचा स्वतःचा प्रशस्त असा अनुभव हाेता.म्हणून ते म्हणतात, “वस्तू कडू असेल तर गाेड करता येईल.खारट असेल, तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल.पण विषाचे अमृत करता येणार नाही.हिंदू धर्मात राहून जाती भेद नष्ट करु असे म्हणने म्हणजे विषाचे अम्रुत करू असेच म्हणन्यासारखे आहे.” बाबासाहेबांचं हे मत कुणीही खाेडुन काढु शकत नाही.म्हणूनच त्यांना धर्मांतराचा मार्ग निवडावा लागला.
१९५६ ला १४ आँक्टाेबर राेजी धर्मांतराचा माेठा साेहळा नागभुमी नागपुर येथे पाच साख अनुयायांच्या साक्षीने पार पडला.आणि पाच लाख जनतेला बाैद्ध करून घेतलं.भारत हा बुद्धांची जन्मभुमी,कर्मभुमी असलेला देश आहे.ईथुनच जगाने बुद्ध घेतला.म्हणजे बाैद्ध धर्म घेतला.पण जगात प्रकाश पेरणारा हा धर्म ईथेच काळाच्या पडद्याआड झाला.

देशातील ढाेंगसाेंग कर्मकांडाचे वाढते प्रस्थ ईतर धर्मीयांचा प्रभाव,परकीय,स्वकीय आक्रमणं……….. ईत्यादी अनेक कारणांनी हा धर्म देशात अगदी नावालाही नव्हता.तरी जग बुद्धभुमी म्हणून भारताकडे बघत हाेता. हा देश बाैद्धमय हाेता हा ईतिहास झाला.पण १९५६ च्या धर्मांतराने देश बौद्धमय झाला हा आपला वर्तमान आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातुन बाहेर पडुन बाैद्ध धर्मात प्रवेशलाे.आणि नव्या संस्कृतीचे वारसदार ठरलाेत.आपल्या पुजापाठ ,व्रतवैकल्य,गंडादाेरा,कापुर,शेंदुर, नवस अशा अनेक कर्मकांडातुन बाहेर पडलाे.या अर्थाने १४ ऑक्टोबर हा आमचा संस्कृतीचा दिवस ठरताे. पण आपण तेवढं भान ठेवताे का?. हा महत्वाचा प्रश्ऩ आहे. संस्कृती या शब्दातच चालीरीती,प्रथा परंपरा, रितीरिवाज ईत्यादींचा समावेश हाेताे.

आपण हिंदुंपासुन वेगळे झालाेत. आता त्याला ईतकी वर्षे झालीत. आपण किती बदललाेत? हा प्रश्न प्रत्येक बाैद्धांनी स्वतःला विचारण्याची वेळ आलीय.दिवाळी दसऱ्याची चाहुल लागली की अजूनही आपण लाेखंडी वस्तू,अवजारं,शस्त्र वगैरे काढुन स्वच्छ करताे.आणि विधीवत पुजा करताे. दसरा आणि अशाेक विजयादशमी असं एक चुकीचं नातं जाेडलं गेलं.अशाेक विजयीदशमी हा एक स्वतंत्र विषय आहे.ताे य़थावकाश चर्चेला आणू.सध्या आपल्या संस्कृतीचा जैसे थे चा विचार करू. धर्मांतरा नंतर आपण फार काही बदल स्विकारले नाही.आपण धड हिंदू ही राहीलाे नाही आणि धड बौद्ध ही झालाे नाही.हे विधान अनेकांना खटकणारं वाटेल. परंतू हे वास्तव आहे.आपले लाेक हिंदू सणांचा सारखा पाठलाग करतांना दिसतात. अजूनही काही गधे गणपती मांडतात.काही कान्हाेबा मांडतात. दिवाळीला लक्ष्मीपूजा करतात.खरेतर आपल्याकडे पैसा येणं आणि ताे टीकुन राहाणं हे आपल्या श्रमशक्तीवर आणि नियाेजनावर अवलंबुन असतं.आपली दिवसाला शंभर रुपये मजुरी असेल आणि आपण साठ रुपयांची दारु पिऊन चाळीस रुपयांचा सट्टा लावला असेल तर आपण नक्कीच आर्थिक संकटात सापडणार.मग संकटातुन बाहेर पडायचं असेल तर आपल्या व्यसनांना लगाम घालावी लागेल. ईथे लक्ष्मीची काेणतीही भुमिका नाही. पण बाबासाहेबांचा डाेळस बुद्ध आपण नाकारताे तेव्हा आपला कल अशा निर्थक कल्पनांना कवटाळण्याकडे जाताे.

त्यामुळे ईतरांनी बुद्ध नाकारला का? बाबासाहेब स्विकारला का? अशा तात्वीक प्रश्नावलीत गुंतुन पडण्याचा नैतिक अधिकार आपण गमाऊन बसताे. आणि ईतरांची बाेटंही आपल्याकडे वळलेली असतात. अनेक हिंदू सणऊत्सव आपण साजरे करताे. बाबासाहेब असते तर त्यांना हे सारं बघुन किती वेदना झाल्या असत्या ! धर्मांतरानंतर बाबासाहेब म्हणाले हाेते,”आज माझा पुनर्जन्म झाला.मी एका नरकातुन बाहेर पडलाे” त्यांच्या अशा व्यक्तपणातून हिंदू धर्माविषयीची चीड स्पष्ट हाेते. पण आपल्यातील काही अवसरवादी अद्यापही शेर पायलीने पाणी देणाऱ्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतात.त्यांना अजुनही नरकात रहायला आवडतं.खऱ्या बाैद्धांनी यातुन बाहेर पडलं पाहीजे.दसऱ्याला लाेखंड धुनं थांबलं पाहीजे.दुचाकी चार चाकी गाड्यांची पुजा थांबविली पाहीजे. सकाळी पहील्यांदा गाडी चालवायला घेतली की अनेकजण पाया पडतात.आणि तरीही त्यांचे अपघात हाेतात. म्हणजे पाया पडण्याचा आणि अपघात हाेण्याचा सुतराम संबंध नाही. आपण पाचशे वर्षांनी सुधारलाे,असं एकीकडे म्हणताे आणि दुसरीकडे वरिल प्रकारे आपण आपला मागासलेपणा सिद्ध करताे. समाजशास्त्राच्या भाषेत याला सांस्क्रुतिक पाश्चायन (कल्चरल लँग) म्हणतात. मग चला या मागासलेपणातुन बाहेर पडुयात.

१४ एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. १४ आँक्टाेबर हा धम्मचक्रप्रवर्तन दिन.हे दिवस जवळ आले की घरांना रंगरंगाेटी करा. एकमेकांना पेढे वाटा.आपली आर्थिक बाजू बघुन फटाके ऊडवा. मेनबत्त्या,पणत्या जाळुन घराला प्रकाशमय करा.नवे कपडे घ्या. आर्थिकतेने सधन असलेल्यांनी वर्गणी करा.आणि समाजातील दुर्बल घटकांना व्यावसाईक करा. महीलांनी आवडल्यास एकमेकींकडे जाऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम करा.किंवा विहारात एकत्र येऊन हा ऊखाण्यांचा कार्यक्रम करा. दान करा. आणि वेळेवर सुचवले जाणारे कार्यक्रम करा हे करा. बघा, वेगळा अनुभव येईल. हिंदू धर्माच्या कचाट्यातुन बाहेर पडुन नव्या प्रथा, परंपरा, चालीरिती, रितीरिवाज, आणि नवी संस्कृती अनुभवता येईल. आपण नव्या संस्कृतीचे वारसदार आहाेतच.

✒️राजू बाेरकर(लाखांदूर,जिल्हा भंडारा)मो:-९४०४११७७०३ /७५०७०२५४६७