दत्तवाडी शाळेची आषाढी वारी दिंडी उत्साहात

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.10जुलै):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी, चांदा ता.नेवासा,जि. अहमदनगर येथे आषाढी वारी दिंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली.मुख्याध्यापक मिलिंद जामदार, शिक्षिका मनीषा लबडे व कांचन कदम यांनी उत्साहात नियोजन केले.चि. वेदांत जावळे याने विठ्ठलाची तर कु.पूर्वा रासकर हिने रखुमाई ची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून हरीनामाचा जयघोष केला. या बाळ गोपालांचा उत्साह व हरिनामाच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिमय झाला होता. या बाल वारकऱ्यांचे सर्व पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले व या दिंडीला सचिन निवृत्ती चौधरी व छाया किरण चौधरी यांनी गोड जेवण दिले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED