“तंत्रज्ञानाचा वापर करुण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापुस पिकाबद्धल मार्गदर्शन”

37

✒️धुळे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

धुळे(दि.१०जुलै):-२०२२ रिलायन्स फाऊंडेशन अंतर्गत डिजिटल फार्म स्कुल च्या माध्यमातून ऑडिओ कॉन्फरन्स द्वारे *कापुस पीक कीड ,रोग व खत व्यवस्थापन* विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली, त्यात सध्या खरीप हंगामात, त्यातच धुळे जिल्यातील प्रमुख पिक म्हणून कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते ,व शेतकऱ्यांना कापूस पिक लागवड व व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी बरेच प्रश्न होते. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा,धुळे यांनी दिनांक ९/०७/२०२२ रोजी नागपुर जिल्यातील ५० शेतकऱ्यांसाठी पिक लागवड व व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. धम्मदीप गोंडाने, रिलायंस फॉउंडेशन धुळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले.या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री.राजेंद्र जाने (माजी कृषि तंत्रज्ञ) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडी करीता विविध जाती कोणत्या आहे ,एकात्मिक कीड,रोग व खत व्यवस्थापन, गांडूळ खत,मित्रकीड शत्रू कीड संगोपन,एक गाव-एक वाण, निमार्क,दशपर्णी अर्क व गुलाबी बोंड अळीचे नियोजन कसे करावे ,कापुस पिकातील खत व्यवस्थापण कसे करावे.तसेच निम्बोळी अर्कचे महत्व कापुस पिका साठी जामिनीची मशागत कशी करावी,कपासी पिकावरिल खर्च कमी करून जास्त उत्पादन कसे घ्यावे या बद्दल मार्गदर्शन केले.या प्रसंगी धुळे जिल्ह्यातील पाच गावातील ५० शेतकऱ्यांनी ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगतीशील शेतकरी दामोदर अहिरे,गोरख महाजन, भूषण महाले, कमलेश सिसोदे,सौरभ पाटील,निखिल चौधरी यांनी केले.