आदर्श प्राथमिक – माध्यमिक शाळेत विठुरायाचा जयघोष व दिंडी उत्साहाने सम्पन्न

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

पिंप्री – तुझे नाम आले ओठी सुर भारावले ,अतरंगी बाह्यअंगी मन हरपले .पिंप्री येथील आदर्श प्राथमिक माध्यमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने शनिवारी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. म्हणून महाराष्ट्रातील परंपरा जोपासना करत आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान करत तसेच मुलींनी विविध मराठमोळ्या संस्कृती जोपासली . तसेच शिक्षकांनी देखील वारीत सहभागी होत विठुरायाचा नामघोष घेत वारी सम्पन्न केली .यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद चौधरी , यशोदा चौधरी , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा , एस के शिंदे , आर एस पाटील , शरीफ पटेल , जितेंद्र पाटील , सचिन पवार , मनिषा पाटील , लिपिक सौरभ देसले , शिपाई सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील आदी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.