जि.प अमरावती येथे आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेचे भव्य निदर्शने

84

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

🔹आशा व गटप्रवर्तकांवर उपासमारीची वेळ 4 महिन्यांपासून मोबदला विनाच करावे लागते काम

अमरावती(दिनांक.12जुलै):-आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतिने आशा व गटप्रवर्तकांच्या थकित मोबदला मागणीसाठी जिल्हा परिषद अमरावती येथे भव्य निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी . मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना आशा व गटप्रवर्तकांचा थकित मोबदला त्वरीत अदा करण्याच्या मागणीचे तसेच अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
*आशा व गटप्रवर्तकांचे मागिल 4 महिन्यांपासून नियमित कामाचा मोबदला थकित असुन अध्यापही सदर मोबदला अदा करण्यात आला नाही . त्यामुळे मागिल 4 महिन्यांपासून नियमित कामाचा मोबदला न मिळाल्याने त्यांच्या परिवारावर उपास मारीची वेळ आली आहे . तसेच राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा वाढिव मोबदला थकित असुन तो त्वरीत अदा करण्यात यावा.

* आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात मोबदला तत्वावर कार्यरत असुन त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन सुध्दा वेळेवर मिळत नाही , कुंटुब चालवण्याकरिता आशांना पर्यायी कामे करणे भाग पडते पंरतु काही अधिकारी आशांना पुर्णवेळ कर्मचारी प्रमाणे सक्तीने व विना मोबदला काम करवुन घेतात तसे न केल्यास संबंधित अधिकारी आशांना केलेल्या कामाच्या व्हाऊचर वर सही देण्यास टाळाटाळ करतात . आशा व गटप्रवर्तक यांची नियुक्ती आरोग्य विभागात मोबदला तत्वावर करण्यात आली असुन त्यांच्या कडुन विना मोबदला काम करवुन घेऊ नये असे त्यांच्या सेवाशर्ती आहे व तसे शासनादेश असतांना आशांन कडुन सक्तिने विना मोबदला काम करवुन घेणे है अन्यायकारक असुन आशां सक्तिने व विना मोबदला काम करवून घेतात हि गंभीर बाब असुन संबंधितांवर योग्य कार्यवाही ची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली *

महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात परंतु त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुधा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात .

आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आशा वर्कर कडून सातत्याने सुरळीतपणे निभवली जात असतांना सुद्धा ,*मा.आरोग्य संचालकांनी 24 जून 2022 रोजी एक आदेश काढून कामात हयगय करणाऱ्या आशा वर्कर ला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे अत्यंत चुकीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आशा वर्कर वर अन्याय होणार आहे तेव्हा वरील आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा आयटक च्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देत आशा वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संघटनेचे जिल्हा सचिव कॉ प्रफुल्ल देशमुख यांनी सांगितले .*

यावेळी आशां व गटप्रवर्तकांचा थकित नियमित कामाचा मोबदला व वाढिव मोबदला त्वरित अदा करण्याची मागणी करण्यात आली व प्रशासन व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .आंदोलनाला शुभेच्छा देण्यासाठी किसान नेते काॅ. अशोक सोनारकर उपस्थित होते.यावेळी .प्रफुल्ल देशमुख, रेखा मोहड ,विध्या रामटेके, उज्ज्वला चौधरी, ललीता ठाकरे वनिता कडू , भारती कासार,मंदा गंजीवाले, जयश्री देवळे,एस.डी.करवाडे,स्वाती बाईस्कर,पुनम नाईक, वैशाली ढोले सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

काॅ. प्रफुल्ल देशमुख
जिल्हा सचिव
म.रा.आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक अमरावती