अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली आहे

28

🔸भटाळी पायली पूरग्रस्त भागाची भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाहणी केली

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.12जुलै):-तालुक्यातील मौजा भटाळी (पा.) येथेही अतिवृष्टीमुळे गावात व शेतशिवारात पाणी घुसल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे दि.१२जुलै मंगळवार रोजी याठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व वेकोलीच्या अधिकाऱ्यांकडून स्थितीची माहिती घेतली.

यावेळी परिसरात असलेल्या वेकोलीच्या खाणीमुळे अनेक समस्या उद्भवत असल्याचे स्थानिकांचे मत होते त्यासाठी वेकोलीच्या अधिकार्‍यांना तातडीने सुधारणा करण्याचे सुचविले. यासोबतच झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना ही संबंधितांना केली.

याप्रसंगी, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, सरपंच राकेश गौरकर, सुभाष गौरकर, उपसरपंच किसन उपरे, सचिव हर्षवर्धन उपरे तसेच वेकोलीचे अधिकारी व ग्रामस्थ बंधूभगिनी उपस्थित होते.