दिव्यदीप बहुद्देशीय संस्था ब्रम्हपुरी च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

45

🔹खद खद भाषाशैली ने विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे नितेश कराळे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13जुलै):-आपला पाल्य मोठा अधिकारी झाला पाहिजे, हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असत. त्या स्वप्नाला उराशी बाळगून पालक आपल्या पाल्यांसाठी जिवाचं रान करून त्यांना घडवण्यासाठी सदोदीत प्रयत्नरत असतात.पालकांच्या व त्यांच्या पाल्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी दिव्यदीप बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा 2022 विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे 16 जुलै 2022 रोज शनिवार ला सायंकाळी 4.30 वाजता आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या अनोख्या खद खद भाषाशैली ने विद्यार्थ्याना घडवणाऱ्या फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक नितेश कराळे सर या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी चे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.मिलिंद शिंदे साहेब व नागभिड नगर परिषद चे मुख्याधिकारी राहुल कंकाळ साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच उद्घाटक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा चे सचिव डॉ.देवेश कांबळे हे सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील.या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. स्निग्धा राजेश कांबळे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नितेश कराळे सर ब्रम्हपुरी शहरात प्रथमच येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ व इतर प्रमुख अतिथी च्या मार्गदर्शनाचां लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा आपल्या जवळच्या मित्र , नातेवाइकांना सांगावे असे आवाहन संस्थेचे सचिव सतिश डांगे, उपाध्यक्ष राजेश कांबळे, सहसचिव ॲड.आशिष गोंडाणे, कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभूर्णे , सदस्य लखन साखरे, राहुल मैंद, ज्योती दुफारे,वसुधा रामटेके,मंगेश नंदेश्वर,संजय बिन्जवे यांनी केले आहे.