जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या धोकादायक पुलांना भेटी ; संथ गतीने होणाऱ्या नवीन पुलाच्या कामाबाबत केली कान उघडणी

34

🔹प्रशासनाला फिल्ड वर राहण्याचे आदेश

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड(दि.15जुलै):-यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्यातील पूर ग्रस्त भागाचा दौरा केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना फिल्ड वर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

मागील 8 दिवसांपासून उमरखेड तालुक्यात व परिसरात मुसळधार पाऊस पडत असून पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे.

यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गावात साचलेल्या पाण्यामुळे व वाहत जाणाऱ्या नाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

या सर्व पूरपरिस्थिती चा आढावा घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्याचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला.

तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना फिल्ड वर राहण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.

यावेळी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

【जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या धोकादायक पुलांना भेटी ; संथ गतीने होणाऱ्या नवीन पुलाच्या कामाबाबत केली कान उघडणी】

सततच्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

मार्लेगांव फाट्याजवळील उमरखेड- हदगाव पुलापर्यंत पाणी आले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड हदगाव पुलाल भेट दिली असून त्या ठिकाणी संथ गतीने होणाऱ्या नवीन पुलाचे कॉन्ट्रॅक्टर सदभाव कॅन्स्ट्रकशन च्या मालकाला लवकरात लवकर पुलाचे काम करण्याची सूचना दिली आहे.

मागील वर्षी एस.टी. गेली होती वाहून मागील वर्षाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दहागांव चे जुने पुल पाडून यावर्षी नवीन पुलावरून वाहतूक सुरु आहे. मागील वर्षी दहागांव च्या याच पुलावरून एस टी पाण्यात वाहून पाच लोकांचा बळी गेला होता.

यानिमित्ताने मागील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.