उमरखेड नगरपरिषद क्षेत्रातील चार नगरामधील रहिवाशांचे नाली व रस्त्या अभावी हाल !

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो.9823995465

उमरखेड (दि. 15 जुलै):-स्थानिक नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य कॅनॉलच्या बाजूला असलेले गणेश नगर 2 ,मोहन नगर, आनंद नगर, देवकाई नगर व रंगलक्ष्मी नगर मधील मुख्य रस्त्यांची वाताहात झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देऊनही रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे त्यामुळे 12 जुलै रोजी परत एक निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की उमरखेड शहरातील मुख्य कॅनॉलच्या बाजूला असलेले गणेश नगर दोन मोहन नगर आनंद नगर देवकाई नगर व रंग लक्ष्मी नगर येथील मुख्य रस्त्यांना अनेक खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे शाळकरी मुलांना सायकल चालवने अवघड झाले आहे.

अनेक शाळकरी मुले सायकल घेऊन पडत आहेत याशिवायही महिलांना तसेच वयस्कर लोकांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नगरपरिषदेने 11 जुलै रोजी सदर रस्त्यावर मुरूम टाकला परंतु हा मुरूम मोठमोठ्या दगडांनी व्यापलेला आहे त्यामुळे सदर नगरातील रहिवाशी भीक नको पण कुत्रा आवर असेच म्हणत आहेत या मुरमातील मोठमोठ्या दगडामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी आणखी जास्त दुरावस्था वाढली आहे सदर कामावर नियंत्रण असलेले अभियंता यांचे या नगराकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार या रहिवाशांनी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नाल्या स्वच्छ असणे आवश्यक आहे.

आकाशातून पडलेले पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते परंतु या चारही नगरातील नाल्या तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर सैरभैर पळत आहे.त्यामुळे नगरपरिषद उमरखेडचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ या रस्त्याचा व नाल्यांचा योग्य ते व्यवस्थापन करून प्रश्न निकाली काढावा…!

अन्यथा संबंधित कार्यालयाला पूर्व सूचना देऊन नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून माजी नगरसेवक गजेंद्र ठाकरे, रवी कदम, नवल कळसे देशमुख सर, राहुल चौरे ,दशरथ इटकरे, संतोष वाडकर, बंडू कानकाटे व ईतर स्थानिकांनी दिला आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED