राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वृक्षरोपण

40

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.17जुलै):-कुटुंबातील चार सदस्यांसाठी एका वर्षभरात जितक्या आँक्सिजनची आवश्यकता असते, तितका आँक्सिजन एक सामान्य आकाराचे झाड एका वर्षभरात निर्माण करते. झाडे लावा, झाडे जगवा… हा मंत्र घराघरात पोहचला पाहिजे. पर्यावरण संतुलन राखण्याचे कार्य प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून केले पाहिजे.असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कार्तिक पाटील यांनी वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शनात व्यक्त केले.

यावेळी गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायकराव कापसे, सहसचिव नारायण डांगाले, कैलास धनोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डोंगरवार, सचिव श्रेयस लाखे, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल बन्सोड, डॉ. हरेश गजभीये, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. पितांबर पिसे, डॉ. राजेश्वर रहांगडले, डॉ. लक्ष्मन कामडी, डॉ. उदय मेंडूलकर, प्रा. आशुतोष पोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे यांनी केले. उपस्थितांचे आभार रासेयो सहकार्यक्रमअधीकारी डॉ. नितीन कत्रोजवार यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. वृक्षारोपनात कडुलिंब, पिंपळ, वड, अशोका, फायकस, आंबा आदी झाडे लावण्यात आली.