भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी यांची सुवर्ण महोत्सवी शाळेला सदिच्छा भेट

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.18जुलै):- धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेला भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी गणेश दुर्गुडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन यांनी भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी गणेश दुर्गुडे यांना शाल – पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यू. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान शाखाधिकारी यांनी भारतीय स्टेट बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली आरोग्य, शेतीविषयक, तसेच शैक्षणिक योजनांची सविस्तर अशी माहिती देऊन शिक्षकांची हितगुज केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी तर आभार एच.डी.माळी यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED