घुग्घुस ते म्हातारदेवी रोडचे काम तातडीने सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

🔹सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस ते म्हातारदेवी रोडची अवस्था ही खुप वाईट परिस्थिती आहे ज्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप मोठा त्रास सहण करावा लागत आहे गाडीने जाणे काय पायदळ सुध्दा ये -जा करणे अशक्य झाले आहे तडाली ते घुग्घुस हा सिमेंट रोडचे काम सुरू होऊन तब्बल तीन वर्षे पुर्ण झाली परंतु ह्या रोडचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही तडाली ते लायडस मेटल कॉलनी इथपर्यंत रोडचे काम झालेले आहे परंतु अद्याप म्हातारदेवी ते घुग्घुस या रोडचे काम सुरू केले नाही.

म्हणून सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर यांनी उपविभागीय बांधकाम अभियंता साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली की घुग्घुस ते म्हातारदेवी रोडचे काम तातडीने सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर यांनी दिला यावेळेस योगेश नगराळे मायाताई सांड्रावार शरद पाईकराव अशोक आसमपल्लिवार, जगदीश मारबते दत्ता वाघमारे अशोक भगत, आदित्य सिंह राकेश पारशिवे सोनु फुलकर ओम डोरलीकर कुणाल कामतवार अंकीत नालमवार सिद्धार्थ गुडदे उपस्थित होते

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED