वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा

29

🔸शेतमजूर युनियन व किसानसभेने केली निवेदनाद्वारे मागणी

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.27जुलै):- गेल्या एक महिन्यापासून संपुर्ण विदर्भात अतिवृष्टी सुरू असून त्याचा परीणाम कारंजा तहसील मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे .शेतकऱ्यांचे सोयाबीन ,कपाशी , तूर , मुंग ईत्यादी सर्व नगदी पिके शेतात सडली आहे व अती पावसाने जळली आहे.यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गावर प्रचंड आर्थिक संकट आलेलं आहे . शेतात गेल्या नंतर शेतकऱ्यांना आपले मरण उघड्या डोळ्यांनी दिसत आहे . या संकटातून सावरण्यासाठी वर्धा जिल्हा हा ओलादुष्काळग्रस्त तातडीने जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारंजा तहसिलचे नायब तहसीलदार श्री. साळवे साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

वर्धा जिल्हा तातडीने ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा , प्रत्येक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई द्या , पुढील हंगामासाठी खते बिबीयाने मोफत द्या , शेतकऱ्यावरील सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करा , पिक विमा कंपण्यामार्फत न राबवता सरकार मार्फत राबवा , ईत्यादी मागण्या निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांनकडे सादर केल्या.यावेळी निवेदन देतांना शेतमजूर युनियन व किसान सभेचे अनील चव्हान , वनीता खवसे , वैशाली टीपले, छाया पाटील, दिलीप रेवतकर, पुरुषोत्तम कांबडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते . वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर शेतमजूर युनियन व किसान सभा कारंजा तालुक्यात आंदोलन करेल असा ईशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .