मांगली येथील कार्यरत ग्रामसेवक श्री गणेश मुके आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

🔸चांगल्या कार्याचा अविस्मरणीय दाखला

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजामणी(दि.28जुलै):- तालुक्यातील जामणी येथील छोट्याशा गावात श्री गणेश शामराव मुके यांचे वास्तव्य असून सध्या ते मांगली ग्रामपंचायतला कार्यरत आहे. सन २०२०-२०२१ मध्ये त्यांनी केलेले अनेक कामकाज विचारात घेऊन पंचायत विभाग जिल्हा परिषद यवतमाळ कडून त्यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्काराकरीता निवड करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा आज दि. २७ जुले २०२२ रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला त्यांना सपत्नीक कुटूंबासह उपस्थिती दर्शविण्यास सांगण्यात आले. जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी चांगल्या कामाचा मिळालेला एक दाखला असून त्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण आहे. हा अविस्मरणीय क्षण डोळ्यापुढे ठेवून ते भविष्यात देखील असेच उत्तम कार्य करतील यात काही वाद नाही.

त्यामुळे भविष्यातही त्यांचे चांगल्या कामात व इतर अनेक उपक्रमात असेच योगदान राहील हे निश्चित. चांगल्या कामाची कधी ना कधी व कुठे ना कुठे दखल घेतल्या जातेच हे यावरून स्पष्ट दिसून येते. काही मोजकेच ग्रामसेवक व इतर कर्मचारी असे चांगले कार्य करतांना बघायला मिळते. नाही तर बरेच ग्रामसेवक व इतर कर्मचा-यांच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत स्वार झालेलं दिसतं. कुणाला पैशाचा अर्थात संपत्तीचा, कुणाला पदाचा तर कुणाला मी अमुक यांचा खास जवळचा माणूस असल्याचा घमंड असतो. त्यामुळे माझं कोण काय वाकडं करणार? या अविर्भावात ते मनमानी कारभार करताना नजरेस पडतात.

सद्यस्थितीत माझ्याच ग्रामपंचायत मध्ये तसं सुरू आहे. एकही विकास काम सध्याच्या परिस्थितीत सुरू नाही. परंतु कार्यालयीन कामे जोरात सुरू आहे. कार्यालयात टेबल-खुर्च्या आणणे, रंगरंगोटी करणे, लाईन फिटींग यासारखे कामे धुमधडाक्यात सुरू आहे. आधीचे ग्रामसेवक ठिकच होते, परंतु त्यांच्या पतीच्या अति उतावळेपणामुळे त्यांना गुडघ्याला बाशिंग बांधताच आले नाही. त्यामुळे त्यांचे स्थानांतरण करण्यात आले. आलेले नवीन ग्रामसेवक काहीतरी चांगले करतील, अशी नागरिकांना एक आस होती. परंतु चांगुलपणाचा मुखवटा चढवून ते सुद्धा सर्वच खात्याला पोखरत चालले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED