जि प शाळा विठ्ठलवाडा येथे पार पडली बाल चित्रकला स्पर्धा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28जुलै);- मुख्य कार्यपालन अधिकारी आदरणीय डॉ मिताली शेट्टी यांच्या प्रेरणेतून मिशन गरुडझेप अंतर्गत वर्ग 5 ते 8 (गट ब)च्या विद्यार्थ्यांची जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे शाळा स्तरावर बाल चित्रकला स्पर्धा पार पडली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्याच्या दृष्टीकोनातून ही स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमध्ये इयत्ता 5 ते 8 च्या 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे विषय होते माझा आवडता नेता,माझा आवडता सण,व मी पाहिलेले स्वप्न.प्रत्येक विषयावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी व सुंदर चित्रे काढली.या स्पर्धेचे मूल्याकन विषय शिक्षक विठ्ठल गोंडे सर व गौतम उराडे सर यांनी केले.विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक छोटुभाई आवडे,गौतम उराडे,विठ्ठल गोंडे,वामन कोकुलवार, रविंद्र उमरे,नारायण मोरे,गणेश गेडाम व गीतांजली चौधरी उपस्थित राहून सदर बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन व नियोजन केले.अशा प्रकारे जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे उत्साही वातावरणात बाल चित्रकला स्पर्धा पार पडली.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED