वंचित बहुजन युवा आघाडीच्या खंडाळा तालुका व कराड दक्षिण च्या कार्यकारणी जाहीर

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31जुलै):-वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री.निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशान्वये व वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य,सातारा जिल्हा निरीक्षक (माजी न्यायाधीश) ॲड.सचिन जोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री सनी तुपे यांच्या प्रयत्नांनी वंचित बहुजन युवा आघाडी सातारा जिल्ह्यातील खंडाळा व कराड दक्षिण या दोन तालुक्यांच्या तालुका कार्यकारणी जाहीर करणेत आल्या.

यावेळी कराड दक्षिण चे अध्यक्ष म्हणून अक्षय प्रशांत कांबळे यांची तर उपाध्यक्ष म्हणून अमर बळी तलाखे आणि महेश बाबुराव कांबळे यांची निवड करणेत आली.तसेच खंडाळा तालुका कार्य कारणी जाहीर करताना तालुका अध्यक्ष म्हणून दीपक किसनराव चव्हाण यांची निवड करणेत आली सरचिटणीस अक्षय शामराव जाधव तर उपाध्यक्ष दिनेश गजानन खुंटे व अमोल जाधव यांची निवड करणेत आली.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्याचे अभिनंदन करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष सनी तुपे म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्षवाढीच्या उद्देशाने आपणा सर्वावर ही पदाची जबाबदारी देण्यात येत आहे.

आपल्या पदाचा उपयोग करून पक्षाला नव्या उंचीवर नेहण्यासाठी कटिबद्ध रहाल. आगामी काळात आपल्या कार्याचा ठसा उमटवून वंचित बहुजन आघाडी पक्ष मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रामाणिक योगदान द्याल.वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणीच्यावतीने सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करणेत आले व त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.