चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ ग्रस्त घोषित करा

29

🔸नितीन मत्ते यांची अजित पवारांकडे मागणी

✒️प्रतिनिधी चिमूर(बालू सातपुते)

चिमूर(दि.31जुलै):-शेतकरी नेते नितिन मत्ते माजी शिव सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे चंद्रपूर जिल्हा दौरा वर असतांना यांच्याशी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात शेतकरी नेते शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी निवेदन सादर केले.

यावेळी श्री रमेश मेश्राम उपजिल्हाप्रमुख शिवसेना, नरेशबाबू काळे शिवसेना तालुका संघटक भद्रावती, आशिष ठेंगणे प्रसिद्धी प्रमुख विधानसभा वरोरा , राजुभाऊ सारंगधर नगरसेवक नगर परीशद . भद्रावती , मंगेश ढेंगळे उपतालुका प्रमुख , प्रविण थेरे , लक्ष्मण चिंचोळकर, श्री विलास चिकाटे श्री महादेव उमरे श्री पांडूरंग बोढाले चेतन घोरपडे हे उपस्थित होते यादरम्यान अजित पवार यांनी सभागृहात चर्चा करून जिल्ह्याला ओला दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात येईल असे शेतकरी नेते श्री नितीन मत्ते माजी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांना आश्वासन दिले .