काँग्रेस कमिटीच्या वतीने डहाणूतील केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच्या घरावर थेट निषेध मोर्चा

29

🔸राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सक्रिय पाठिंबा,जनतेत प्रचंड आक्रोश

✒️डहाणू(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

डहाणू(दि.1ऑगस्ट):-देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यात बेरोजगारी, महागाई , जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले प्रचंड दर , जीवनावश्यक वस्तूंवर लादलेली जीएसटी , प्रचंड वाढलेले पेट्रोलियम पदार्थांचे दर आणि घरगुती गॅस व घरगुती तेलीय पदार्थांचे दर, त्यात महागाईने व बेरोजगाराने त्रस्त झालेली देशातील जनता या कारणांनी गेल्या दोन आठवड्यापासून संसदेत काँग्रेसच्या खासदारांनी महागाई व बेरोजगारी विरोधात सत्ताधारी पक्षाला जाब विचारून रान उठवले असताना ,गेल्या पंधरा दिवसापासून संसदेत काँग्रेसच्या महागाई व बेरोजगारीवरील प्रश्नाने बीजेपी सरकार पूर्णतः संसदेत निरुत्तर झाली आहे.

अश्यावेळी विरोधी पक्षाच्या प्रश्नाने बीजेपी सरकार जेरीस आलेली असताना , काहीतरी मुद्दे उपस्थित करून बेरोजगारी व महागाई या निर्माण समस्येवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जे प्रकरण शांत झालेले असतानाही बीजेपी कडुन त्याला हवा देऊ मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी व जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच संसदेत स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांचा अवमान केला आहे. परिणामी देशातील जनतेत असंतोष निर्माण झाले असून , देशात अनेक ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने तालुका डहाणू येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने डहाणू स्टेशन ते केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच्या घरापर्यंत थेट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काँग्रेसचे व राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे प्रचंड संख्येने कार्यकर्ते सदरच्या आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी मोर्चा रस्त्यात अडवून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्षा संध्याताई सवालाखे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अविश राऊत , प्रदेश चिटणीस योगेश नम ,महिला जिल्हा अध्यक्षा शेरयु औसरकर यांनी मोर्चातील कार्यकर्त्यांना संबोधित केले. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादलचे चिटणीस लोकेश पाटिल, पालघर जिल्हा उपाध्यक्षा दीपाली वानखेडे ,प्रदेश मीडिया सरचिटणीस सीमा पोद्दार , चिटणीस रोशन पाटील, प्रदेश पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर वर्तक, पालघर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष रुफी भूरे, मोईज शेख अरशद खान ,मधुकर चौधरी व बळवन्त गावित, जिल्हा अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष आसिफ मेमन, वकील संगठना अध्यक्ष एड.सुधीर जैन, पालघर जिल्हा कांग्रेस सरचिटणीस रामप्रकाश निराला, एड. मनोज दांडेकर व प्रकाश संखे , रसबतरिया, उज्ज्वला साळवे, प्रवीण चौधरी, उत्तर प्रदेश विधायक उम्मेदवार निर्मला भारती, पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर,डहाणू तालुका अध्यक्ष सन्तोष मोरे, पालघर तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी, विक्रमगड तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी, पालघर शहराध्यक्ष मनोहर दांडेकर , अदनान डांगे, राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव , उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे , महिला जिल्हा अध्यक्षा विद्याताई मोरे , पालघर जिल्हा उपाध्यक्ष अहमद खान , डहाणू तालुका उपाध्यक्ष सिराज शेख , डहाणू तालुका अध्यक्षा वहिदा शेख , डहाणू तालुका महिला उपाध्यक्षा शीतल वानखेडे , पालघर महिला अध्यक्ष स्मिता वानखेडे , डहाणू तालुका सहसचिव रुपेश बारी , वानगाव शहर सहसचिव सुदाम दामले , डहाणू खाडी विभाग उपाध्यक्ष परशुराम मडवे ,डहाणू खाडी विभाग युवा अध्यक्ष शिवम मडवे , डहाणू तालुका सदस्य संजीवनी बेसकर ,ज्योति पैंडकर , नाझमा खत्री , यास्मीन शेख , साजू मरदेव , नाजमा खलीफा , शैनाझ शेख ,अबीद शेख व पँथर्सचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.