प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर तालुकाप्रमुख विशाल सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.2ऑगस्ट):-उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गावचे युवक नेतृत्व,एका शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र विशाल श्रीराम सपकाळ यांच्या कार्याचा आणि जीवन प्रवासाचा थोडक्यात आढावा.प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या जोमाने कार्य करत आहे.हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

आणि यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील,शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,शहर संपर्कप्रमुख जमीर शेख,शहर कार्याध्यक्ष खालील मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख विशाल श्रीराम सपकाळ यांच्या नेतृत्वात आपल्या प्रहार सैनिकांना घेऊन कर्तव्यनिष्ठ कार्याच्या जोरावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेने आपली एक वेगळी ओळख/छाप निर्माण केलेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर विशाल श्रीराम सपकाळ यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती आणि यामध्येच प्रहार जनशक्ती पक्षाने सामाजिक कार्याची दखल घेऊन तालुकाप्रमुख या पदाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी सध्या ते जोमाने कार्य करून पार पाडत आहेत.

यामध्ये थोडक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा : प्रथमता उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी नियमित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा व पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवून रस्ता दुरुस्ती केला.शेतकऱ्याला शेतीची नियमित वीजपुरवठा ठेवण्यासाठी आंदोलन व पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.त्यानंतर सीना नदीला पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सीना नदीला पाणीही सोडले. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आपल्या बातमी लेखणीतून वारंवार शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला आणि ऊस कारखान्यावर जाऊन आंदोलनाचा इशारा देखील दिला. त्याचबरोबर दूध दरवाढीसाठी आवाज उठवला. सिमको कंपनीतील कामगारांच्या थकीत पगारासाठी केलेले ठिय्या आंदोलन पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाई साठी जिल्हाधिकारी यांना निवेदन व पाठपुरावा केला आणि उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांसाठी स्वतःच्या शेतामधील बोरवेलद्वारे पाणीपुरवठा केला प्रहारच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप शालेय ठिकाणी वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना वस्तू व खाऊ वाटप.कोरोना काळात कामगारांना स्वखर्चाने मास्क आणि सॅनिटायझर वाटप. तसेच कोरोना काळात आपल्या बातमी लेखणीतून सर्वसामान्यांसाठी जनजागृती केली.

मराठा आरक्षण साठी आपल्या लेखणीतून नेहमी आवाज उठवून बातमी लेखन केले.त्यांच्या सामाजिक,राजकीय,पत्रकारिता या सर्व क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जवळपास त्यांना 15 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. एक सर्वसामान्यांचा “युवक नेता” म्हणून त्यांची जनसामान्यांमध्ये ओळख निर्माण झालेली आहे.ते सध्या शिवणी शाळेमध्ये शिक्षणतज्ञ,इंडियन ऑइल मध्ये सेफ्टी इंजिनियर, पत्रकार,महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अशा या प्रहारच्या आणि शेतकरी पुत्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.व आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय प्रहार !!

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED