भिम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुसद पुसद बस स्थानकामध्ये उत्साहात साजरी

35

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2ऑगस्ट):-१ ऑगस्ट रोजी स्थानिक पुसद शहरातील बस स्थानकामध्ये लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती भिम टायगर सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मारोती भस्मे पत्रकार तथा अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड ,पत्रकार संजय रेक्कावार, पत्रकार मनोहर बोंबले, भिम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे ,पत्रकार विष्णू धुळे, पत्रकार लक्ष्मणदादा कांबळे ,गजानन हिंगमिरे, माजी पोलीस पीएसआय राजेंद्र नाईक, मारुती कांबळे पत्रकार ,विष्णू सरकटे सामाजिक कार्यकर्ते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार यांच्या हस्ते मारोती भस्मे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नंतर आर .पी .आय .आठवले गटचे अध्यक्ष लक्ष्मणदादा कांबळे यांच्या हस्ते वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अण्णा दोडके भिम टायगर सेना जिल्हा सचिव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रास्ताविक लक्ष्मणदादा कांबळे यांनी विचार मांडले यानंतर सामाजिक कार्यकर्ते विष्णू सरकटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मपासून सविस्तर स्वरूपात आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कांबळे यांनी केले तर आभार भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे यांनी मानले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भीम टायगर सेनेचे सर्कल प्रमुख जनार्दन झोडगे ,प्रीतम आळणे ,दीपक गायकवाड ,पांडू दोडके, सीमाताई आसोले, संजय शेळके, नारायण दोडके, शुभम दोडके ,उत्तम कोले, लक्ष्मण दोडके ,समाधान दोडके ,उमेश सुरोशे ,भाऊराव जाधव, गजानन दोडके, रामू दोडके ,गजानन बोखारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी केला.