महावितरणचा नगरपालिकेला दणका; थकीत विजबीलापोटी विजपुरवठा खंडीत

54

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2ऑगस्ट):- नगरपालिका इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरणने नगरपालिका प्रशासनाला चांगलाच दणका दिला. महावितरणने नगरपालिकेच्या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. दोन दिवसांपूर्वी हा विद्युत खंडित करण्यात आल्‍याने याचा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे शहरातून लाखोंची वसूली होत असताना दुसरीकडे वीज बील भरण्यापोटी पैसा नसल्याचे कारण नगरपालिका समोर करते. यामुळे वीज कंपनी थेट नगरपालिकेचा विद्युत पुरवठा तोडते; ही एकप्रकारे नगर पालिकेवर आलेली नामुष्की म्हणावी लागेल. लाईट नसल्याने सर्वर डाऊन होत आहे. त्यामुळे नगरपाकिकेतील अनेक कॉम्प्युटरवर होणारे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे पालिकेमध्ये आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

दोन लाख थकीत

याविषयी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना फोन करून विचारले असता, ते म्हणाले की मी बाहेर आहे. महावितरणचे पालिकेकडे जवळपास दोन लाख रुपये वीज बिल थकीत होते. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी वीज पुरवठा खंडित केला. मात्र महावितरणला आम्ही चेक दिला आहे. त्यामुळे वीज पुरवठा अखंडित करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. असं उमेश ढाकणे म्हणाले. तर पालिकाचे प्रशासक असणाऱ्या उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांना संपर्क साधला असता, त्यांनी मीटिंगचं कारण देत फोन घेतला नाही.

प्रशासकाकडून दुर्लक्ष

दरम्यान शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगर पालिकांवर प्रशासक नेमण्यात आले. मात्र याच प्रशासकांच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागतोय.