जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3ऑगस्ट):-कार्यकर्ता म्हणून आरोग्य कर्मचारी हे वेळेवर कर्तव्यावर हजर आहेत का नाही एवढंच न पाहता आगामी काळात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही आपण कटीबद्ध राहू अशी ग्वाही आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी हरंगुळ येथील उपकेंद्रात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यासमोर दिली.

हरंगुळ यात्रेनिमित्त आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर , वाघालगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे, विक्रम बाबा इंमडे,, प्रेमानंद बर्वे यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देत तेथील उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या. यावेळी डॉक्टर कर्मचाऱ्यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सत्कार केला .येशील कर्मचाऱ्यांना निवासी राहण्यासाठी काय अडचण आहे. वीजपुरवठा आहे का?. स्वच्छ पाणी मिळते का? वेगवेगळ्या आजारासह सर्पदंशावर देण्यात येणारे इंजेक्शन उपलब्ध आहे का? आदी चौकशी केली. त्याचबरोबर उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावात कुठल्या कुठल्या गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळले या संदर्भातही चर्चा झाली.

येथील उपकेंद्राची इमारत मोडकळीस झाली असून भविष्यात केव्हाही संभाव्य धोका होऊ शकतो यासाठी आपण या इमारतीबाबत वरिष्ठांना लेखी कळवावे अशी सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली . आरोग्य सेविका घोबाळे यांनी प्रवेशद्वारासमोरच पाण्यावर तरंगती डासाची काढलेली रांगोळी पाहून त्यांचेही कौतुक केले. यावेळी कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गीते उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिडके आरोग्य सहाय्यक रंगनाथ आव्हाड, पंडित, योगशिक्षक लक्ष्मण निरस ,विठ्ठल निरस ,भारती जाधव आदि सह कोद्री प्रथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ,आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात्रेच्या निमित्ताने आलेल्या शेकडो पेशंट वर उपचार करून गरजेप्रमाणे औषध गोळ्या देण्यात आल्या.