डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि योजनेची थकबाकी तात्काळ विध्यार्थ्याना द्यावी – किशोर खरात

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4ऑगस्ट):-अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील ११ वी,१२ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाप्रमाणे भोजन निवास, निर्वाह देण्यासाठीची शासन योजना आहे..परंतु सदर योजना केवळ सरकारी कागदावर अडकून पडल्याने एक ते दीडवर्षात दिसून आले आहे सदर योजनेची थकबाकी रक्कम तात्काळ विध्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करणेत यावी अन्यथा भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या वतीने आंदोलन करणेत येईल अशा आशयाचे निवेदन दिल्याचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर खरात यांनी सांगितले या निवेदनात आपल्यासाठी केवळ एक योजना आहे.

परंतु सर्वसामान्य विद्यार्थी जो दुर्बल आर्थिक आल्यासाठी शिक्षण घेताना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवण्याचे एक माध्यम आहे. तरीदेखील या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून योजनेची थकबाकी रक्कम मिळालेली नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कर्ज काढून शैक्षणिक साहित्य खानावळ, पुस्तकाला खर्च करावा लागत आहे. पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हा खर्च विद्यार्थ्याच्या आवाक्या बाहेर जात आहे. याच काळात लॉकडाउन मध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, व पालकांवर येणारा दाग बघून विध्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य वाढत आहे .अशाच एका घटनेतून २०१८ मध्ये आपण योगेश पावरा सारख्या अभ्यासू विद्यार्थी मानसिक तणावातून आत्महत्या करून गमवला आहे.

मागील सरकारची चुकीचे धोरण जर वर्तमान सरकार पुढे चालवत असेल तर, राज्यात दुसरा योगेश पावरा घडू शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असे घडू नये यासाठी दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि योजनेची थकबाकी सहित पूर्ण रक्कम सरकार व्दारे जमा केली जावी. हीं मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा या निवेदना व्दारे करीत आहे.

जर १५ ऑगस्ट पर्यंत हि रक्कम विद्यार्थ्यांना मिळाली नाही तर १६ ऑगस्ट रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात सरकार विरोधात आंदोलन करण्यास बांधील राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनानी असेल . कारण या राज्यात भारतीय विद्यार्थी मोर्चा दुसरा कोणी योगेश पावरा होऊ देऊ इच्छित नाही.या विविध मागण्याचं निवेदन आज माण तालुक्यातून मा. नायब तहसीलदारसो यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आलेची माहिती किशोर खरात यासनी दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED