महागाई थांबवा, शेतकऱ्यांना तातडीची आर्थीक मदत द्या !

31

🔹गंगाखेड कॉंग्रेसचे निवेदन 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5ऑगस्ट):-वाढत्या महागाईस पायबंद घालावा, शेतकऱ्यांना तातडीची हेक्टरी ७५ हजार रूपये मदत द्यावी, गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, अग्नीपथ योजना परत घ्यावी याच बरोबर केंद्र सरकारच्या वतीने केला जाणारा केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग थांबवावा आदि मागण्यांचे निवेदन आज गंगाखेड कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर कॉंग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केले. गंगाखेड कॉंग्रेसच्या वतीनेही तहसीलदारांना निवेदन देत शासनाचे गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. जीएसटी, विविध क्षेत्रातली भाववाढ, बेरोजगारी, अग्नीपथ योजना आदि बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास कॉंग्रेसच्या वतीने रस्त्यावरील आंदोलन केले जाईल, असा ईशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

या प्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, शहराध्यक्ष शेख युनूस, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, युवा नेते सुशांत चौधरी, अजा विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, हाजी गफार शेख, मिडीया राज्य सहयमन्वयक सिद्धार्थ भालेराव, भटके- विमुक्त नेते रामेश्वर भोळे, युवक जिल्हा ऊपाध्यक्ष नागेश डमरे, स्वयंरोजगार विभाग तालुकाध्यक्ष शिवाजी घोबाळे, एनएसयुआय तालुकाध्यक्ष महेश गरड, अजीम सय्यद, शेख अज्जू, बन्सी चव्हाण, फकीरचंद राठोड, शेख महेबुबभाई, दत्ता व्हावळे, शेख अखिल आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते.