शेतकऱ्यांना युरिया न देणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा – वैभव जावळे

27

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.5ऑगस्ट):-: मोहोळ तालुक्यातील खत दुकानदार शेतकऱ्यांना युरिया देत नाहीत व युरिया घ्या पण त्यासोबत लिंक म्हणजेच छोटं पिल्लु घ्या तरच युरिया मिळेल अशी वागणूक दुकानदार शेतकऱ्यांना देत आहेत अशा तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे आल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुकाप्रमुख वैभव जावळे तालुक्यातील पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या व त्यांच्यावर कारवाई करा.

अशा सूचना केल्या खत दुकानांमध्ये खताचा स्टॉक किती आहे खताचा दर किती आहे असा बोर्ड दुकानाबाहेर लावणे बंधनकारक असताना एकाही दुकानदाराच्या दुकानाबाहेर बोर्ड नाही अशाही दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून करण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी लवकरच त्यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे 

यावेळी तालुकाप्रमुख वैभव जावळे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर, उपतालुकाप्रमुख नानासाहेब ननवरे, युवक आघाडी उपाध्यक्ष भुतासिद्ध म्हमाणे प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ, गणेश बळवंतराव ,सावळाराम जावळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.