ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे शालेय गणवेश व स्कूल बॅग वितरीत

28

🔸कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या हे उपस्थित होते

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6ऑगस्ट ):-स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन ब्रम्हपुरी च्या वतीने नुकताच नेवजाबाई हितकारणी विद्यालय नवगाव पांडव येथे 90 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व स्कूल बॅग वितरीत करण्यात आले. विद्यालयात शालेय गणवेश व स्कूल बॅग वितरीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमा च्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच ॲड. शर्मिला रामटेके,प्रतिष्ठित नागरिक डॉ. विठ्ठल बोरकुटे,सामजिक कार्यकर्ते अरुण येवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एस.ठाकरे मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. ठाकरे सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात फाउंडेशन च्या वतीने 1995 पासून सदर उपक्रम सुरू असून त्यांनी फाउंडेशनचे आभार मानले. प्रमुख अतिथी ॲड. शर्मिला रामटेके व अरुण येवले यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात अशोकजी भैय्या यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रश्न विचारले. संस्था नेहमी शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे शिक्षक पालक यांच्यातला सुसंवाद साधला जाऊन शाळेचा विकास व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक मुनिराज कुथे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश डांगे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील शिक्षक श्री.ललित महाजन सर,श्री वी. के. बेदरे सर,श्री.जी.डब्ल्यू.नीपाने सर, श्री.मनोज हेमके सर,श्री.एन. बी. चूर्हे सर, रेवनाथ ठवरें सर,रवी सोनटक्के,लिपिक शांताराम नीकुरे,शिपाई बंडू फुकट आदी कर्मचारी उपस्थीत होते.