देशाचा अमृत महोत्सव आला पण शहजाणपूर चकला ते मादळमोही रस्ता आणखी एकदाही पूर्ण नाही झाला

29

🔸तालुक्यातील नेत्यांना करता नाही आला हीच यांच्या कार्याची पावती

🔹15 आगस्ट रोजी करणार युवक आमरण उपोषण

🔸मतदान मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना लाज कशी नाही वाटत

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7ऑगस्ट):- तालक्यातील शहाजांनपुर चकला हे गाव साधारणतः 3 ते 4 हजार लोकसख्येचे आहे. 75 वर्षे झाली देश स्वतंत्र झाला परंतु शहाजांपुर चकळा ते मादळमोही हा रस्ता एकदाही पूर्ण डांरीकरण झालेले नही,याच आक्रोषाने शहाजान पुर ची गावातील जनता आक्रमक झालेली असून, रस्ता व्हावा या मागणीसठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही, म्हणून समस्त शहाजन पूर च्या जनतेने 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्व जासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा देण्यात आला आहे.

तरी प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा जनता आक्रमक झाल्यावर प्रशासनाला महागात पडेल असा इशारा आंदोलन करत्यांनी प्रशासनाला दिला आहे. 15 ऑगस्टला सर्वजण एकत्र या असे आवाहन आंदोलन कर्त्यांनी केले आहे.

मतदान मागण्यांसाठी रात्री अपरात्री फिरणारा तरुन,कार्यकर्ते यांना समज यायलाच पाहिजे ,सुशिक्षित युवक तरुणांनी पुढे यावे अशी विनंती गावकरी मांडली यांनी केली आहे.व सर्व युवक तरुणांनी एकत्र या हीच वेळ आहे आपला विकास करून घेण्याची आहे अस ही पत्रकात म्हटले आहे ,रस्तासाठी संघर्षयोद्धा प्रतिष्ठान आक्रमक होणार असे सुद्धा सुत्रांनी सांगितलं आहे