कामती खुर्द येथे मा. विजयराज डोंगरे यांच्या ४५व्या वाढदिवसानिमित्त 145 जणांनी रक्तदान केले. विविध कार्यक्रमाचे आयोजन: बंडू पाटील

34

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.७ आॅगस्ट):- रोजी मा सोलापूर जिल्हा अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कामती खुर्द मध्ये दादाचे आगमन होताच कामती चौकात भल्यामोठ्या क्रेनने पुष्पहार घालून जंगी स्वागत व रक्तदान, शालेय गरजु विद्यार्थ्यांना ५१ सायकलींचे व २१ गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन व २१ शेतकरी बांधवांना पाठीवरील चार्जिंग पंपाचे, भव्य रक्तदान शिबिराचे फित कापून उद्घाटन सोलापूर जिल्हा अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, बंटी पाटील, आण्णासाहेब पाटील, पतंगे दादा व मान्यवरांच्या हस्ते कापुन उद्घाटन व लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मोहोळ तालुक्याचा कोहिनूर हिरा विजयराज डोंगरे यांच्या शाल श्रीफळ फेटा बांधून बंटी पाटील व ग्रामस्थ व मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित सर्जेराव चवरे,, जयसिंग अवताडे, सुशील भैय्या क्षीरसागर ,विनोद भोसले, नितीन सोनटक्के, दिलीप गायकवाड, राहुल क्षिरसागर, रामचंद्र पतंगे, पांडुरंग बचुटे, सुनील पाटील, पैलवान बाळासाहेब पवार, विठ्ठल माळी ,लखन फडतरे, सागर होनमाने, प्रकाश पारवे, दीपक गवळी, दीपक पुजारी, सचिन सुरवसे, विकास वाघमारे, देविदास नाईकनवरे, साधीभाई तांबोळी ,सर्जेराव काकडे ,सागर थोरात ,संजय तळेकर, गहिनाथ जाधव, अण्णासाहेब पाटील, समाधान जाधव, युवराज ढेरे ,महेश हळवे ,राजकुमार पाटील, गणेश माळी, पत्रकार सुहास घोडके व पत्रकार बधू आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 गरजु विद्यार्थ्यांना ५१ सायकल, गरजू महिलांना 21 शिलाई मशीन, गरीब शेतकरी बांधवांना २१ चार्जिंग पंपाचे वाटप करण्यात आले. १४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर .., समाजाच्या अडचणी जाणीव घेऊन समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन सतत समाजकार्याची ओढ असणारे बंडू पाटील यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कारण आज नेत्याचा वाढदिवस म्हटलं की अनावश्य खर्च केला जातो असं न करता समाजाला उपयोगी पडेल असे कार्य करावे*.