मुलभूत समस्यांकडे लक्ष विचलित करण्यासाठी घर घर तिरंगा अभियान?

28

भारतीय संस्कृती वर्णव्यवस्था जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या साडेतीन टक्केवाल्यानी निर्माण केली. त्यांनी रामायण महाभारत बहुजनांच्या डोक्यात फिट करून ठेवले आहे. त्यामुळेच ते भारत स्वातंत्र आंदोलनात भाग न घेता विरोध करीत होते. ज्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला,त्याच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव त्यांना साजरा करावा लागतो. ज्यांनी १९४७ पासून काल पर्यंत कधी घरात आणि त्यांच्या संस्था, संघटना, शाळा, कॉलेजच्या कार्यालयात राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा लावला नाही.तेच लोक आज सत्ताधारी असतांना महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,खाजगीकरण,शिक्षण,आरोग्य,शेतकरी यांच्या मुलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लोकांचे लक्ष विचलित करून घर घर तिरंगा अभियान राबवितात.

शासकीय प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी प्रशासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका (आशा) यांना कामाला लावले गेले आहे. भारतीय तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे. तो घरा घरावर लावण्यासाठी नसतो.तर सोसायटीचे मैदान, कार्यालय, शाळा, कॉलेज सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालय,सर्व पक्षांचे कार्यालय या ठिकाणी दरवर्षी गेल्या ७५ वर्ष लागत आला आहे.त्याला सक्ती करण्याची गरज पडली नाही. भारतीय नागरिकांच्या मनांत विद्यार्थी म्हणून पहिल्या वर्गापासून शाळांमध्ये राष्ट्रीय धव्ज म्हणजेच तिरंगा काय आहे ते शिकविला जातो. त्यामुळेच प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर तिरंगा रुजला आहे.त्यामुळे तिरंगा कधी आणि कुठे फडकवायचा हे भारतीय नागरिकांना तो कोणत्याही जाती,धर्माचा,पंथाचा,राज्याचा असो त्याला सांगायची गरज नाही.
पण ज्यांनी ७५ वर्षात त्या तिरंग्याला मानाचा मुजरा केला नाही. लोकप्रतिनिधी असतांना ही मानवंदना दिली नाही. झेंडावंदन करते वेळी जाणूनबुजून दुर्लक्ष केले.आणि बूट घालून किंवा भारतमाताचा फोटो लावून, सत्यनारायण महापूजा ठेऊन राष्ट्र ध्वजाचा कळत नकळत अपमान केला. ते लोक आज घरा घरात तिरंगा लावून सन्मान करणार आहेत. कि अपमान? कारण भारतीय संविधानात राष्ट्रीय ध्वजारोहण कुठे,कधी आणि कोणी करावे यांची लिखित नियमावली आहे. ती पायदळी तुडविण्या साठीच हे घर घर तिरंगा अभियान आहे असे लिहले तर चुकीचे होणार नाही.

भारतीय संविधानात ज्यांचे ज्यांचे महत्व सांगितले ते घरा घरात अपमानकारक वापरून त्यांचा बट्याबोल करण्याची ही मनुवादी मानसिकता आहे. त्यामुळेच अपोआप दोन गटात मतभेद सुरु होऊन जातीय दंगल पेटविण्याची आणि मुलभूत समस्या वरून नागरिकांचे लक्ष हटविण्यात यशस्वी होता येईल. ही संकल्पना या मागे आम्हाला संविधान प्रेमी जागरूक नागरिकांना म्हणून दिसते. ती मी माझा शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

२००९ ते २०१४ पर्यंत जो प्रचार भारतात होता. मतदारांना अच्छे दिनाचे स्वप्ने दाखविले. ते २०१४ ते २०१९ मध्ये पूर्ण झाले नाही. त्याचे उत्तर देण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती.तरी त्यांनी ई व्ही एम मुळेच पुन्हा सत्ता मिळवली हे शंभर टक्के सत्य असले तरी ते स्वीकारण्याची हिंमत आज ही ५६ इंच छाती असलेल्या नेतृत्वाला नाही. गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत नेतृत्वात नाही. विशेष जी व्यक्ती जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ना संसदेत देते आणि ना पत्रकार परिषदेत. अशा व्यक्तीने भारतीय नागरिकांना घरा घरात तिरंगा फडकवा हे सांगायची गरज का वाटावी हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.सत्ताधारी असतांना महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी, खजगीकरण,शिक्षण,आरोग्य, शेतकरी यांच्या मुलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लोकांचे लक्ष विचलित करून घर घर तिरंगा अभियान राबविण्याचे उद्धिस्ट काय साध्य करणार आहे.

देशाची सत्ता एकहाती ठेऊन ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रत्येक पानांवरील कायदा कलमाच्या फुल्या मारून चिंधड्या विडवलल्या आहेत. अशी हुकुमशाही गाजविणारी व्यक्ती नागरिकांच्या मुलभूत समस्यांना कोलांटी उडी घेऊन प्रत्येक घराबाहेर नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे सांगत आहे.ज्याला स्वताला तिरंगा झेंड्याची किंमत कळत नाही तो सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर घाम पुसण्यासाठी करतो.तो गरिबांच्या घराबाहेर झेंडा लावून  महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,खाजगीकरण,शिक्षण,आरोग्य,शेतकरी या मुलभूत समस्यांपैकी कोणत्या समस्या सुटणार आहेत?. गरिबांना हक्क म्हणून दिली जाणारी मदत भिक म्हणून जी व्यक्ती संबोधते आणि उद्योगपती मित्रांवर जनतेचा पैसा खैराती सारखा उधळते त्या व्यक्तीने तिरंगा फडकवण्याचे महत्व सांगितले नाही. कामगार,बेरोजगार,व्यापारी आणि शेतकरी जे अन्याय अत्याचारा विरोधात आंदोलने करतात त्यांना ही व्यक्ती आंदोलनजीवी म्हणून हिणवते त्या व्यक्तीने घरा घरावर तिरंगा लावला पाहिजे हे अभियान राबविते.तेच व्यक्ती ज्यांनी ज्यांनी ७५ वर्षात तिरंगा कार्यालयात लावला नाही.त्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवील काय?

आज घरा घरात चूल पेटविण्यासाठी कशाची आवश्यकता आहे.ती ग्रस सिलिंडर ची किंमत कमी होईल काय? महागाई विरोधात लढणाऱ्या मुलांना रोजगार मिळणार आहे? कुटुंबातील प्रत्येक घरातील व्यक्तीला उत्तम आणि माफक दरात आरोग्यसेवा मिळणार आहे?. प्रत्येक घरातील आणि सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना माफक दरात शिक्षण मिळणार आहे महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,खाजगीकरण,शिक्षण,आरोग्य,शेतकरी यांच्या मुलभूत समस्यांशी संघर्ष करता करता घरा घरातील घर टिकविणारी व्यक्ती टिकणार आहे ?.हर घर तिरंगा अभियाना वर जो खर्च होत आहे तो शिक्षण,आरोग्यावर जी एस टी सूट देण्यासाठी खर्च केला असता तर देशातील करोडे विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरून लाभार्थी झाले असते.आरोग्यावर होणारा खर्च परवडत नाही म्हणून करोडो रुग्ण हॉस्पिटल मध्ये टाळतात. ते टाळता आले असते.सत्ताधारी असतांना महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,खाजगीकरण,शिक्षण,आरोग्य, शेतकरी यांच्या मुलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लोकांचे लक्ष विचलित करून घर घर तिरंगा अभियान राबविणाऱ्यांना यह आझाद झुठी है,तरी अमृतमहोत्सव साजरा करावा लागतो.

अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्यांनी मोहनदास करमचंद गांधींचा खून का केला, हे न सांगता तोच गांधी महात्मा म्हणून जगभर जाईल तिथं मांडावा लागतो. देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा होऊ नये म्हणून जिवाची बाजी लावून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तोच देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा घरा-घरात फडकविण्याची आवश्यकता का वाटावी हे न सुटणारे कोडे आहे. म्हणूनच मुलभूत समस्यांकडे लक्ष विचलित करण्यासाठी घर घर तिरंगा अभियान?. भारतीय नागरिकांनी आवश्यक तेवढा बोध घ्यावा आणि जे जे होत आहे ते ते पाहून शांत बसावे.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९